Monday, November 23, 2009

मिस कॉल.............. एक आठवन

मुलात  science ला admission घेणे म्हणजे स्वताला  काही वर्ष अभ्यासासाठी  बांधून घेणे. science ला कॉलेज एन्जॉय कारन म्हणजेच अभ्यास करण. त्यातून माझ b. pharmacy लास्ट इयर म्हणजे अभ्यास - अभ्यास अणि फक्त अभ्यास दिवसभर lecture, practicals , notes , library , सततच्या परीक्षा एवढाच चक्र सुरु होत. बर रविवार वगलता याला एकही दिवस फाटा नसतो ह. coomerece college छे कट्टे बघा, सतत ओसंड्लेले. पण आम्ही मात्र कॉलेज मध्ये जाउन सुध्हा मित्र - मैत्रिणी निवांतपणे बोलाले मला अथवत नाही. ही काही तकरार नाहीये, करण हे क्षेत्र निवाड़ाने हा माझाच निर्ण्याय होता.
      दिवस भराच्या ह्या चक्रतुन थोडा change म्हणून रोज संध्याकाळी अभ्यासातून थोडा वेळ काढून आमचे एकमेकाना मिस कॉल  देने, messge  करने , कधी चाटिंग , अणि कधी कधी कॉल पण होत असत. पण तसा बघायला गेला तर मिस कॉल म्हणा किंवा messge  म्हणा त्यातून फरसा काही साध्य होत नसला तरीही दिवस भराच्या धब्द्ग्यातुन एकमेकांची आठवन काढल्याचा, टी धेव्ल्याच एक समाधान   मिलत, तेव्ह्दिच थोडीशी गम्मत पण येत होती.
                 पण माझ्या ह्या मज्जेवर हल्ली आई - बाबांची गदा अलिये. सारखा माझ्यावर लक्ष ठेवून असतात. आई -बाबांना संशय यायला लागलाय की कोनाश ठावुक . माला तर कलाताच    नाहीये असा का वगाताहेत! माला सतत काही न काही प्रश्न विचारत असतात. काय गा बाई काय चालालय तुझा अलीकडे जरा जास्तच फोन वाजतोय तुझा! कोणाचे गा फोन येत असतात तुला नेहमी? एवढा वेळ हसून खिदलुन कोणाशी बोलत असतेस ग?  तुलाच बरे फोन येतात आमचा डब्बा तर कधी तरी चुकून वाजतो ग!  असले एक न अनेक प्रश्न चालू असतात.
            मला काळात नहिये दिवस भरातुन थोडा वेळ मित्र -मैत्रिन्निन्शी गप्पा मारल्या तर बिघडते कुठे! पण नाही , जरा कुठे फोन वाजला की लगेच आईच्या कपलावर आठ्या . आता कुठे मी फोन वर बोलायला सुरुवात केली की, आई चक्क माझ्या शेजारीच   हे म्हणजे जरा अतीच होताय. दिवस भराच्या थाकाव्यतुन, टेंशन मधून  मला थोड़ी
privacy घेण्याचा हक्क नाही का?  जरा कुठे फोन वाजला की लगेच " हा जा आता प्राइवेट गप्पा मारा तुम्ही रूम मध्ये जावून बोला ह!" चालू देत तुझा private असच. आता काही ही पोर एका   तासाच्या आत आमच्यात येइल असा वाटत नाही . अशी बरीच वाक्ये सुरु होतात. आणि  असे messege म्हणा किंवा फोन वर बोलण्याने मी आय लगेच कोणाच्या प्रेमात पडणार आहे का? याचा अर्थ मी काय घरातून पालूं जाणार आहे का ? आणि  सांगितले की friend चा फोन होता की पुढला   प्रश्न हाच  कोण होत? तो / ती?
         हे परमेश्वरा, समजावून संग रे बाबा माझ्या आई - बाबाना  माझा मन!!!!!

Saturday, November 21, 2009

प्रपोज...ही असते

गंधा (सुगंधा) आणि राजा दोघं कितीतरी वेळ नुसते एकमेकांकडे पाहत होते. ते एक महिन्यापासून एकमेकांना ओळखत असले तरी प्रत्यक्ष एकमेकांसमोर प्रथमच आले होते. ते एकमेकांना नुसते ओळखतच नसून त्यांनी सर्वार्थाने एकमेकांना जाणून घेतले होते. एकमेकांच्या स्वभावातल्या सर्व खाचाखोचा त्यांना माहित झाल्या होत्या. तरीही प्रत्यक्ष एकमेकांसमोर येताच त्यांना काय बोलावे काही सुचत नव्हते. ते एवढे स्तब्ध होते की जणू दोन-दोन तिन-तिन पानांची मेल करणारे ते आपणच का? अशी क्षणभर त्यांना शंका यावी. शेवटी त्यानेच पुढाकार घेवून सुरवात केली,


                 '' ट्रॅफिकमधे अडकलो होतो म्हणून उशीर झाला.... ग    ''

                      '' मी तर साडेचार पासूनच तूझी वाट पाहत आहे...''  गंधा  म्हणाली.

                       '' पण तू तर पाचची वेळ दिली होतीस'' ... राजा म्हणाला.


फक्त सुरवात करण्याचाच अवकाश, आता ते एकमेकांना चांगले मोकळे बोलू लागले. मग मनमुराद पणे बोलणे सुरु झाले. म्हणजेच गप्पा सुरु झाल्यात.
बोलत बोलताच  ते हळू हळू बीचच्या रेतीवर समुद्राच्या किनाऱ्या-किनाऱ्याने चालू लागले. चालता चालता केव्हा त्यांचे हात आपसूकच एकदूसऱ्यांच्या हातात गुंफले, त्यांना कळलंच नाही. कितीतरी वेळ हातात हात घालून ते बीचवर फिरत होते. सुर्यास्त होवून गेला होता आणि आता अंधारही पडायला लागला होता. मधेच अचानक थबकून, गंभीर होवून विवेक म्हणाला,.......


                         '' गंधा ... एक गोष्ट विचारू?''

                        तिने डोळ्यांनीच होकार दिला.

माझ्याशी लग्न करशील?'' त्याने सरळच तिला विचारले.....

तेव्हा गंधा काय बोलणार होती...........

त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने ती एक क्षण गोंधळून गेली. आपल्या गोंधळलेल्या मनस्थितीतून सावरताच तिने काही न बोलता लाजून खाली मान घातली.


अरे............ राजा मी अजुन तसा काही विचार नाही केलाय रे ...( मनातील विचार)

                   राजच हृदय आता जोरजोराने धडधडायला लागलं होतं.    
   
                      आपण मनाचा हिय्या करुन हा प्रश्न तर विचारला...

                           पण ती 'हो' म्हणेल की 'नाही'?...




                         तो तिच्या उत्तराची प्रतिक्षा करु लागला.

                      आपण हा प्रश्न विचारायला जरा घाईच तर नाही ना केली?...

                                ती जर 'नाही' म्हणाली तर?...

                  त्याच्या डोक्यात नाना शंका डोकावू लागल्या.

                           थोड्या वेळाने ती म्हणाली,

                        '' चला आपल्याला निघायला पाहिजे..''

            तिने बोलायला सुरवात केली तेव्हा पुन्हा त्याचे हृदय धडधडायला लागले होते...

                       पण हे काय तिने त्याच्या प्रश्नाचे उत्तर टाळले होते...

    पण तो एक पीएचडी चा विद्यार्थी होता. कोणत्याही प्रश्नाचा छडा लावणे त्याच्या रक्तातच होते.

             '' गंधा ... तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस..'' त्याने तिला हटकले.

        '' चल मी तुला सोडून येते'' ती पुन्हा त्याच्या प्रश्नाच्या उत्तराला टाळत म्हणाली.

                  पण तोही काही कमी नव्हता.

                  '' अजून तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस''

ती लाजेने चूर होत होती. तिची मान खाली झूकलेली होती आणि तिचा गोरा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता. ती आपल्या भावना लपविण्यासाठी पायाच्या अंगठ्याने जमीन कुरेदू लागली.


                     '' मी थोडीच नाही म्हणाले'' ती कशीबशी खाली मान ठेवूनच म्हणाली.

आपल्या तोंडून हे शब्द बाहेर पडले याचे तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते.राजाचा  आतापर्यंत भांड्यात पडलेला जीव आता कुठे सावरला होता. त्याला इतका आनंद झाला होता की त्याला तो कसा साजरा करावा काही सुचत नव्हते. त्याने न राहवून तिला प्रेमाने आपल्या घट्ट मिठीत ओढून घेवून उचलले....

टिप: वरील कथानक हे श्री बाबासाहेब लोखंडे ह्याच्या जवालिक ह्या पुस्तकातील आहे
मला ते कथानक खुपच आवडले .म्हणून मी थोडक्यात ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्हला आवडल असेल अशी मी आशा करते.....

असे












































      


























 

Friday, November 13, 2009

common sense मुलीना असतो की नसतो

हा blog लिहिण्याचे खरे कारन म्हणजे मला विषय सापडत नव्हता पण इशान कुलकर्णी ह्यानी मला त्याबद्दल जरा प्रवचन दिले थोडक्यात का होइना त्याचा सारांश हा होता की मुलीना common sense नसतो. पण मी म्हणेन की हे खोट आहे. तसा बघायला गेला तर common sense हा प्रत्येकालाच असतो मग तो मुलगा असो व मुलगी ते कही ठरवून येत नसत. sense म्हणजे के हे जर कलल तर common sense पण अर्थ चटकन समजतो. sense चा अर्थ माझ्यामते अक्कल असा होतो. जर मुलीना अक्कल नसते तर मुलानाही ते लागु होते. जर मुलीना sense च नसतो तर मूल का मागे लागतात मुल्निच्या असा मी म्हणेन. जर sense असेल तर
 खलील शब्द वाचून त्याचा अर्थ लावा म्हणजे मला कलेल की माझ्या भावना तुमच्या पर्यन्त पोहोच्ल्यात   आयुष्य हे समुद्र आहे हृदय हा किनारा आहे,
 आणि  मित्र म्हणजे लाता आहेत.
समुद्रात किती लाता  आहेत हे महत्वाचा नसून,
त्या किनारयाला किती स्पर्श करतात ते महत्वच असत.

आताह्या वरील ओलींचा आपणाला अर्थ लागला असेल तर त्याला मी म्हणेन की sense आहे म्हणुन नाही तर......
जर आपनास काही सुचवायचे असल्यास आपण आपले अभिप्राय देऊ शकता.

    महत्व्हाची टिप : मला ह्या blog द्वारे कुणालाही दुखावण्याचा हेतु नव्हता तर एक गोड प्रयत्न होता की, मुलगा  असो वा मुलगी sense हा प्रतेकलाच असतो तेव्हा ही बाब खोटी आहे की मुलीना so called common sense नसतो.

ह्या blog वर आपले अभिप्र्य निश्चित पणे अपेक्षित आहेत.

Saturday, October 24, 2009

संताप

एकदा एक माणूस नवी कोरी कार धूत होता. अगदी मन लावून त्याचे काम चालले होते. तिथेच असलेली त्याची चार वर्षाची मुलगी दगड घेऊन काही तरी करत होती. थोड्यावेळाने त्याने पाहिले तर ती टोकदार दगड घेऊन त्या गाडीवर काही तरी लिहीत होती. त्याचा संताप अनावर झाला. ‘केलास सत्यानाश?’ असं म्हणत संतापाच्या भरात त्याने जवळची एक काठी घेतली आणि मुलीच्या बोटांवर मारली. चार वर्षाची चिमुरडी बिचारी कळवळून रडायला लागली. काठीच्या मार एवढा जोरात होता की तिच्या नाजूक हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलं. वडिलांनी मारलं तरी मुलगी मात्र त्यांच्यावर रागावली नव्हती. ‘बाबा, माझी बोटं पुन्हा चांगली कधी होणार’ असं ती त्यांना विचारत राहिली. तिचे वडिल काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून फक्त आपल्या कृत्याचा पश्चात्ताप तेवढा वहात होता. त्यांना स्वतःच्या कृतीवर संताप आला. आपण गाडीच्या प्रेमापोटी आपल्या मुलीला मारले हे त्यांना सहनच झाले नाही. त्याच भरात ते गाडीजवळ गेले आणि तिच्यामुळे हे घडले म्हणून त्या नव्या कोर्‍या गाडीवर लाथा झाडायला लागले. थोड्यावेळाने त्यांचे लक्ष गाडीवर लिहिलेल्या अक्षरांवर गेले. त्यांच्या मुलीने तिथेच काही तरी खरडलं होतं. त्यांनी जवळ जाऊन नीट पाहिलं. त्यावर त्या मुलीनं लिहिलं होतं, ‘बाबा, लव्ह यू’. त्या मुलीच्या वडिलांनी दुसर्‍या दिवशी आत्महत्या केली.
बोध :
त्यामुले संताप हा माणसाला कुठेही घेउन जातो . कुठलीही गोष्ट पूर्णपणे विचार करुनच करावी त्यातच खरी कसोटी असते .

Friday, October 23, 2009

कॉफीची चव................ खारट की गोड???

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्राणप्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो.
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"

Saturday, October 10, 2009

काही प्रश्न न सुतन्या सारखे जे मला नेहमी उद्भवतात

काही प्रश्न न सुतन्या सारखे : जे मला नेहमी उद्भवतात : कदाचित तुम्ह्लाही कधी कलि पडले असतील

१}जंगल मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती?2
2}फ्री गिफ्ट" म्हणजे काय? गिफ्ट फ्रीच असतात ना
३}प्रकाशाचा वेग माहिती आहे.... अंधाराचा किती असतो?
४}"फ्रेंच किस"ला फ्रान्स मध्ये काय म्हणतात? 5
5}जर आपला जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर ईतर लोक कशासाठी जन्मलेत?6
6}२१ - ट्वेंटी वन , ३१ - थर्टी - वन मग, ११ - वन्टी वन का नाही?.............
7}पेरुची बी आणि दातांतील फट, एकाच मापाची का असते?..............
8}छतावरचा पंखा घडाळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध तर टेबलावरचा पंखा काट्यांच्या दिशेने का फिरतो?
९}गाडीच्या पाठीमागे "आईचा आशिर्वाद" लिहिणा-यांचे वडील रागीट असतात काय ?

Sunday, July 26, 2009

आपल्या मराठी पण असे कही शब्द आहेत

आपल्या मराठी मध्ये पण असे कही शब्द आहेत ........
जेव्हा अपन एखादी भाषा आणि तिचा वापर करतो तेव्हा नेहमी थोड़ा फार मानत विचार येतोच ........जर माला ही भाषा आत्मसात करता अली तर किती मज्जा येइल म्हणजे मी जे बोलें ते बकिच्याना कलानर नाही पण आपल्या मराठी भाषेत असेही काही शब्द आहेत की जे आपल्याला जसेच्या तसेच वापरावे लागतात
प्रत्येक मराठी मानुस म्हणतो माला मराठी खुप चांगला येता पण कुठे तरी एक शब्द असा तोंडात येतोच की जो इंग्रजी असतो तेव्हा हे म्हानाने अगदी गैर वाटेल की आम्ही मराठी आहोत एरव्ही नेहमी मराठीच अभिमान असणारी माणसा सुध्हा कधी कधी बोलूं जातात इंग्रजी तुन मराठीचा अस्त होतोय का इत्यादी चर्चांमध्ये तर मला बिलकूल रस नाही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासाबरोबरच विकसित झालेली अशी आपली मराठी भाषा आहे। आजच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात, विशेषतः तांत्रिक वापरासाठी मराठीचा दुराग्रहाने केलेला वापर हा क्लिष्टताच वाढवतो, आणि त्याचं वाचन उगीचच अवघड करून टाकतो असे माझे प्रामाणिक मत आहे. प्रत्येक इंग्रजी/हिंदी शब्दास मराठी प्रतिशब्द हा हवाच का हा चर्चेचा विषय ठरेल. इंग्रजीत "जानवे" यास प्रतिशब्द नाही. तसेच मराठीत opera ला चपखल शोभेल असा शब्द नाही. आणि blog ला तर नाहीच नाही. हे सत्य आहे!असे सगळे असताना, दिवसेंदिवस इंग्रजीचा/हिंदीचा बोली भाषेत वापर वाढत असताना काही शब्द, किंवा वाक्प्रचार हळूहळू वापरातून कमी होताना दिसतात. भाषेच्या जीवनातली तिही एक phase असावी. गंमत म्हणून का होईना असे काही आडवळणी शब्द आठवले की ते मनापासून वापरावेसे वाटतात. त्यापैकी असे काही शब्द:
उडाणटप्पू
धटिंगण
ऐसपैस
वायफळ
पटांगण
झणझणीत
असले कही अजूनही शब्द असतील जर तुम्हला पण कही असे शब्द माहित असतील तर टिपण्णी पोस्ट करा
हा मज़ा एक प्रयत्न आहे तो कितपत यशस्वी ठरला आहे ते तुम्ही कलावावे

Thursday, July 9, 2009

INTERESTING MARATHI SURNAMES

1. One who only takes - LELE
2. One with bulb factory - DIVEKAR
3. Maharashtrian Bill Gates - BAL PHATAK
4. One with weight of 100 tonnes - SOMAN
5. Neil Armstrong - NEELESH BHUJBAL
6. One with K on his head - SHIRKE
7. Bakery owner - PAWGI /BUNKAR
8. Narasimha Avtar - POTPHODE
9. One with stomach problem - POTDUKHE
10. One who lives in village - GAONKAR
11. One who only take money - DAMLE
12. One who is brave - WAGH /VEERKAR
13. One who is untidy - GABALE
14. Cotton mill owner - KAPSE /RUIKAR
15. One who eats more - DHOLE/DHAMDHERE
16. One who works very cool - KULKARNI
17. Building constructor - AADEKAR/MAHALE
18. One who is coward - PULEKAR
19. Silver mine owner - CHANDEKAR
20. One who reaches the root - MULEY
21. One who is real cat - MANJAREKAR


  • Colourful maharashtrians
KALE
GORE
HIRWE
KALBHOR
PIWALE
DHAWLE
Some Metallic Maharashtrians-
PITALE
TAMBE
LOKHANDE
SONE

Wednesday, July 1, 2009

do it, its really interesting........ just do it

4 x Ur birth date
+ 13
x 25
- 200
+ month u r born
x 2
- 40
x 50
+ last 2 digit of year u born
- 10500 = ??

some picture that it self say something






































जस्ट फ्रेण्ड बेस्ट फ्रेण्ड


हल्ली फ्रेण्ड/मित्र ही कॉन्सेप्ट जरा बदलली आहे. तुम्हाला नाही असं वाटत? अहो, त्याचं कसं आहे बघा... पूर्वी आपण मित्र कोणाला म्हणायचो?... तर सुखदु:खातआपल्याला साथ देणारी, आपल्याला त्याच्याबद्दल आणि त्याला आपली सगळी माहिती असायची अशा व्यक्तीला आपण मित्र म्हणायचो. हळूहळू काळ बदलू लागला, तशा मैत्रीच्या संकल्पनाही बदलू लागल्या. फ्रेण्ड, बेस्ट फ्रेण्ड, कॉलेज फ्रेण्ड, नेट फ्रेण्ड, चॅट फ्रेण्ड अशा अनेक कॅटेगरीज निर्माण होऊ लागल्या. अमूकतमूक माझा बेस्ट फ्रेण्ड आहे, तर तमूकधमूक जस्ट फ्रेण्ड आहे. अमका कॉलेज फ्रेण्ड, तर तमका नेट फ्रेण्ड असल्याचं सांगत प्रत्येकाला एखादं बिरुद चिकटू लागलं. पण, खरंच मित्रांच्या अशा कॅटेगरीज असतात? एकमेकांचे मित्र म्हणवताना एकमेकांबद्दल, त्याच्या घरच्यांबद्दल फारशी माहितीही एकमेकांना नसते. मग, तरीही अशा व्यक्तींना मित्र म्हणायचं की सहकारी?... तुम्ही दिसल्यावरच हायहॅल्लो करणारे... जस्ट फ्रेण्ड् तुम्ही दिसताच हाय हॅलो करणार पण, नाही दिसलात तर काळजीने तुम्ही कुठे आहात याची चौकशी करणारा... बेस्ट फेण्ड्स जस्ट फ्रेण्डसमोर तुम्ही कधी मनमोकळेपणाने रडला आहात?मन मोकळं करून रडण्यासाठी बेस्ट फ्रेण्डचाच खांदा असतो.वादविवाद झाले, की जस्ट फ्रेण्ड्ससाठी मैत्री संपते.मैत्रीत वादविवाद, भांडणं होतातच!रात्री उशीरा फोन केला, तर जस्ट फ्रेण्ड्सडिस्टर्ब होतात. रात्री उशीरा फोन केला, तर बेस्ट फ्रेण्डला आपली काळजी वाटते. घरी आल्यावर जस्ट फ्रेण्ड्स फॉर्मली (औपचारिकरीत्या) वागतात. तर बेस्ट फ्रेण्ड स्वत:ला काय हवं ते हक्काने मागून घेतात/ स्वत:च शोधून घेतात. तुमच्या प्रेमकहाण्या जस्ट फ्रेण्ड्सना जळवतात, उबग आणतात. बेस्ट फ्रेण्ड्स तुम्हाला खऱ्या प्रेमाची जाणीव करून देतात. गरज असते, तेव्हा जस्ट फ्रेण्ड्सना तुमची मदत हवीच असते. तुम्हाला केव्हाही मदत करण्यासाठी बेस्ट फ्रेण्ड तयार असतात. एकमेकांना भेटण्यासाठी बिझी शेड्युलमधून जस्ट फ्रेण्ड्सना वेळ काढावा लागतो.बेस्ट फ्रेण्ड्सच्या बिझी शेड्युलमध्ये मित्रांसाठीही वेळ असतो. काम असतं, तेव्हाच जस्ट फ्रेण्डस फोन करतात.केवळ तुमचा आवाज ऐकण्यासाठी बेस्ट फ्रेण्ड्स फोन करतात.फोनवर बोलण्यासाठी जस्ट फ्रेण्ड्सकडे विषयांची मर्यादा असते.फोनचं बिल वाढलं, तरी बेस्ट फ्रेण्ड्सचं बोलणं संपत नसतं.

एका कोकणस्थाची मुलाखत

एक पत्रकर एका कोकणस्थाची मुलाखत घेत असतो.तर पत्रकर विचारतो,"अहो मला एक सांगा, तुम्हा कोकणस्थांना सगळे जण चिंगुस(कंजुष)का म्हणतात?" तो कोकणस्थ म्हणतो,"अरे, आता हे बघ माझ हे जे धोतर आहे ना ते मी गेली २० वर्ष वापरतो,अजुन ५ वर्षांनी ते पुर्ण फाटेल,मग मी त्याची गोधडी करीन आमच्या बाळासाठी,मग ती गोधडी फाटली की त्याचे लंगोट करीन,मग ते लंगोट फ़ाटले की त्याच पाय-पुसन करीन,मग ते पाय-पुसन वापरुन वापरुन फाटल की मग त्याच्या वाती वळीन आणि पण्ती मध्ये लाविन.मग त्या वाती जळल्याकि जी राख उरेल त्या राखेने दात घासिन."पत्रकार बेशुध्द ...

माझे विचार

मित्रहो खूप दिवसान पासून blog लिहावा अशी इच्छा होती पण समजत नव्हत कसे लिहावे शेवटी आज अगदी मनवर घेतला आणि लिहिण्यास सुरुवात केली मला खर म्हणजे तसा पहायाल गेल तर काहीच माहित नव्हत blog वैगरे कसा लिहितात पण खर कल्पना सुचली ती आदित्य रिसबूड ह्याच्या कडून मी त्याची खूप खूप आभारी आहे त्यानेच मला सांगितला आज कसे काय करायचे तेव्हा जर काही चुका असतील तर त्या लगेच कळवाव्यात हि विनंती आपणही सामील व्हा ह्या blog मध्ये.

खूप काही लिहावासा वाटतय पण मी काही कवी किंवा लेखक नाहीये प्रत्येक व्यक्तीचे आचार विचार नीर-निराळे असतात ते म्हणतात न व्यकी तितक्या प्रजाती ते खरा आहे. सहसा लोकाना आपल्या भाव भावनाच प्रदर्शन मांडलेले रुचत नाही. आपल मन मात्र मोकळ आपण केलच पाहिजे.तसे पहिली कोणतीही गोष्ट अनुभवतांना नेहमीच मजा येते......

असो मला ते नेहमीच आवडेल बहुतेक माझा हा प्रयत्न सफल झाला असेल असा मला वाटत पाहू आता हा तर पहिलाच म्हणून काही चुका असतीलच तरीही पुढील blog मध्ये नक्की सुधारण्याच प्रयत्न करेन माझी हि कविता बहुतेक आवडली असेल अशी मी अशा करते.

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….


प्रेम प्रेम अन् प्रेमच…….



प्रेम प्रेम अन् प्रेमच…….
गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….

खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….

खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….

खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..

खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……

कारण…..

प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..

Followers