Monday, November 23, 2009

मिस कॉल.............. एक आठवन

मुलात  science ला admission घेणे म्हणजे स्वताला  काही वर्ष अभ्यासासाठी  बांधून घेणे. science ला कॉलेज एन्जॉय कारन म्हणजेच अभ्यास करण. त्यातून माझ b. pharmacy लास्ट इयर म्हणजे अभ्यास - अभ्यास अणि फक्त अभ्यास दिवसभर lecture, practicals , notes , library , सततच्या परीक्षा एवढाच चक्र सुरु होत. बर रविवार वगलता याला एकही दिवस फाटा नसतो ह. coomerece college छे कट्टे बघा, सतत ओसंड्लेले. पण आम्ही मात्र कॉलेज मध्ये जाउन सुध्हा मित्र - मैत्रिणी निवांतपणे बोलाले मला अथवत नाही. ही काही तकरार नाहीये, करण हे क्षेत्र निवाड़ाने हा माझाच निर्ण्याय होता.
      दिवस भराच्या ह्या चक्रतुन थोडा change म्हणून रोज संध्याकाळी अभ्यासातून थोडा वेळ काढून आमचे एकमेकाना मिस कॉल  देने, messge  करने , कधी चाटिंग , अणि कधी कधी कॉल पण होत असत. पण तसा बघायला गेला तर मिस कॉल म्हणा किंवा messge  म्हणा त्यातून फरसा काही साध्य होत नसला तरीही दिवस भराच्या धब्द्ग्यातुन एकमेकांची आठवन काढल्याचा, टी धेव्ल्याच एक समाधान   मिलत, तेव्ह्दिच थोडीशी गम्मत पण येत होती.
                 पण माझ्या ह्या मज्जेवर हल्ली आई - बाबांची गदा अलिये. सारखा माझ्यावर लक्ष ठेवून असतात. आई -बाबांना संशय यायला लागलाय की कोनाश ठावुक . माला तर कलाताच    नाहीये असा का वगाताहेत! माला सतत काही न काही प्रश्न विचारत असतात. काय गा बाई काय चालालय तुझा अलीकडे जरा जास्तच फोन वाजतोय तुझा! कोणाचे गा फोन येत असतात तुला नेहमी? एवढा वेळ हसून खिदलुन कोणाशी बोलत असतेस ग?  तुलाच बरे फोन येतात आमचा डब्बा तर कधी तरी चुकून वाजतो ग!  असले एक न अनेक प्रश्न चालू असतात.
            मला काळात नहिये दिवस भरातुन थोडा वेळ मित्र -मैत्रिन्निन्शी गप्पा मारल्या तर बिघडते कुठे! पण नाही , जरा कुठे फोन वाजला की लगेच आईच्या कपलावर आठ्या . आता कुठे मी फोन वर बोलायला सुरुवात केली की, आई चक्क माझ्या शेजारीच   हे म्हणजे जरा अतीच होताय. दिवस भराच्या थाकाव्यतुन, टेंशन मधून  मला थोड़ी
privacy घेण्याचा हक्क नाही का?  जरा कुठे फोन वाजला की लगेच " हा जा आता प्राइवेट गप्पा मारा तुम्ही रूम मध्ये जावून बोला ह!" चालू देत तुझा private असच. आता काही ही पोर एका   तासाच्या आत आमच्यात येइल असा वाटत नाही . अशी बरीच वाक्ये सुरु होतात. आणि  असे messege म्हणा किंवा फोन वर बोलण्याने मी आय लगेच कोणाच्या प्रेमात पडणार आहे का? याचा अर्थ मी काय घरातून पालूं जाणार आहे का ? आणि  सांगितले की friend चा फोन होता की पुढला   प्रश्न हाच  कोण होत? तो / ती?
         हे परमेश्वरा, समजावून संग रे बाबा माझ्या आई - बाबाना  माझा मन!!!!!

Saturday, November 21, 2009

प्रपोज...ही असते

गंधा (सुगंधा) आणि राजा दोघं कितीतरी वेळ नुसते एकमेकांकडे पाहत होते. ते एक महिन्यापासून एकमेकांना ओळखत असले तरी प्रत्यक्ष एकमेकांसमोर प्रथमच आले होते. ते एकमेकांना नुसते ओळखतच नसून त्यांनी सर्वार्थाने एकमेकांना जाणून घेतले होते. एकमेकांच्या स्वभावातल्या सर्व खाचाखोचा त्यांना माहित झाल्या होत्या. तरीही प्रत्यक्ष एकमेकांसमोर येताच त्यांना काय बोलावे काही सुचत नव्हते. ते एवढे स्तब्ध होते की जणू दोन-दोन तिन-तिन पानांची मेल करणारे ते आपणच का? अशी क्षणभर त्यांना शंका यावी. शेवटी त्यानेच पुढाकार घेवून सुरवात केली,


                 '' ट्रॅफिकमधे अडकलो होतो म्हणून उशीर झाला.... ग    ''

                      '' मी तर साडेचार पासूनच तूझी वाट पाहत आहे...''  गंधा  म्हणाली.

                       '' पण तू तर पाचची वेळ दिली होतीस'' ... राजा म्हणाला.


फक्त सुरवात करण्याचाच अवकाश, आता ते एकमेकांना चांगले मोकळे बोलू लागले. मग मनमुराद पणे बोलणे सुरु झाले. म्हणजेच गप्पा सुरु झाल्यात.
बोलत बोलताच  ते हळू हळू बीचच्या रेतीवर समुद्राच्या किनाऱ्या-किनाऱ्याने चालू लागले. चालता चालता केव्हा त्यांचे हात आपसूकच एकदूसऱ्यांच्या हातात गुंफले, त्यांना कळलंच नाही. कितीतरी वेळ हातात हात घालून ते बीचवर फिरत होते. सुर्यास्त होवून गेला होता आणि आता अंधारही पडायला लागला होता. मधेच अचानक थबकून, गंभीर होवून विवेक म्हणाला,.......


                         '' गंधा ... एक गोष्ट विचारू?''

                        तिने डोळ्यांनीच होकार दिला.

माझ्याशी लग्न करशील?'' त्याने सरळच तिला विचारले.....

तेव्हा गंधा काय बोलणार होती...........

त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने ती एक क्षण गोंधळून गेली. आपल्या गोंधळलेल्या मनस्थितीतून सावरताच तिने काही न बोलता लाजून खाली मान घातली.


अरे............ राजा मी अजुन तसा काही विचार नाही केलाय रे ...( मनातील विचार)

                   राजच हृदय आता जोरजोराने धडधडायला लागलं होतं.    
   
                      आपण मनाचा हिय्या करुन हा प्रश्न तर विचारला...

                           पण ती 'हो' म्हणेल की 'नाही'?...




                         तो तिच्या उत्तराची प्रतिक्षा करु लागला.

                      आपण हा प्रश्न विचारायला जरा घाईच तर नाही ना केली?...

                                ती जर 'नाही' म्हणाली तर?...

                  त्याच्या डोक्यात नाना शंका डोकावू लागल्या.

                           थोड्या वेळाने ती म्हणाली,

                        '' चला आपल्याला निघायला पाहिजे..''

            तिने बोलायला सुरवात केली तेव्हा पुन्हा त्याचे हृदय धडधडायला लागले होते...

                       पण हे काय तिने त्याच्या प्रश्नाचे उत्तर टाळले होते...

    पण तो एक पीएचडी चा विद्यार्थी होता. कोणत्याही प्रश्नाचा छडा लावणे त्याच्या रक्तातच होते.

             '' गंधा ... तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस..'' त्याने तिला हटकले.

        '' चल मी तुला सोडून येते'' ती पुन्हा त्याच्या प्रश्नाच्या उत्तराला टाळत म्हणाली.

                  पण तोही काही कमी नव्हता.

                  '' अजून तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस''

ती लाजेने चूर होत होती. तिची मान खाली झूकलेली होती आणि तिचा गोरा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता. ती आपल्या भावना लपविण्यासाठी पायाच्या अंगठ्याने जमीन कुरेदू लागली.


                     '' मी थोडीच नाही म्हणाले'' ती कशीबशी खाली मान ठेवूनच म्हणाली.

आपल्या तोंडून हे शब्द बाहेर पडले याचे तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते.राजाचा  आतापर्यंत भांड्यात पडलेला जीव आता कुठे सावरला होता. त्याला इतका आनंद झाला होता की त्याला तो कसा साजरा करावा काही सुचत नव्हते. त्याने न राहवून तिला प्रेमाने आपल्या घट्ट मिठीत ओढून घेवून उचलले....

टिप: वरील कथानक हे श्री बाबासाहेब लोखंडे ह्याच्या जवालिक ह्या पुस्तकातील आहे
मला ते कथानक खुपच आवडले .म्हणून मी थोडक्यात ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्हला आवडल असेल अशी मी आशा करते.....

असे












































      


























 

Friday, November 13, 2009

common sense मुलीना असतो की नसतो

हा blog लिहिण्याचे खरे कारन म्हणजे मला विषय सापडत नव्हता पण इशान कुलकर्णी ह्यानी मला त्याबद्दल जरा प्रवचन दिले थोडक्यात का होइना त्याचा सारांश हा होता की मुलीना common sense नसतो. पण मी म्हणेन की हे खोट आहे. तसा बघायला गेला तर common sense हा प्रत्येकालाच असतो मग तो मुलगा असो व मुलगी ते कही ठरवून येत नसत. sense म्हणजे के हे जर कलल तर common sense पण अर्थ चटकन समजतो. sense चा अर्थ माझ्यामते अक्कल असा होतो. जर मुलीना अक्कल नसते तर मुलानाही ते लागु होते. जर मुलीना sense च नसतो तर मूल का मागे लागतात मुल्निच्या असा मी म्हणेन. जर sense असेल तर
 खलील शब्द वाचून त्याचा अर्थ लावा म्हणजे मला कलेल की माझ्या भावना तुमच्या पर्यन्त पोहोच्ल्यात   आयुष्य हे समुद्र आहे हृदय हा किनारा आहे,
 आणि  मित्र म्हणजे लाता आहेत.
समुद्रात किती लाता  आहेत हे महत्वाचा नसून,
त्या किनारयाला किती स्पर्श करतात ते महत्वच असत.

आताह्या वरील ओलींचा आपणाला अर्थ लागला असेल तर त्याला मी म्हणेन की sense आहे म्हणुन नाही तर......
जर आपनास काही सुचवायचे असल्यास आपण आपले अभिप्राय देऊ शकता.

    महत्व्हाची टिप : मला ह्या blog द्वारे कुणालाही दुखावण्याचा हेतु नव्हता तर एक गोड प्रयत्न होता की, मुलगा  असो वा मुलगी sense हा प्रतेकलाच असतो तेव्हा ही बाब खोटी आहे की मुलीना so called common sense नसतो.

ह्या blog वर आपले अभिप्र्य निश्चित पणे अपेक्षित आहेत.

Saturday, October 24, 2009

संताप

एकदा एक माणूस नवी कोरी कार धूत होता. अगदी मन लावून त्याचे काम चालले होते. तिथेच असलेली त्याची चार वर्षाची मुलगी दगड घेऊन काही तरी करत होती. थोड्यावेळाने त्याने पाहिले तर ती टोकदार दगड घेऊन त्या गाडीवर काही तरी लिहीत होती. त्याचा संताप अनावर झाला. ‘केलास सत्यानाश?’ असं म्हणत संतापाच्या भरात त्याने जवळची एक काठी घेतली आणि मुलीच्या बोटांवर मारली. चार वर्षाची चिमुरडी बिचारी कळवळून रडायला लागली. काठीच्या मार एवढा जोरात होता की तिच्या नाजूक हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलं. वडिलांनी मारलं तरी मुलगी मात्र त्यांच्यावर रागावली नव्हती. ‘बाबा, माझी बोटं पुन्हा चांगली कधी होणार’ असं ती त्यांना विचारत राहिली. तिचे वडिल काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून फक्त आपल्या कृत्याचा पश्चात्ताप तेवढा वहात होता. त्यांना स्वतःच्या कृतीवर संताप आला. आपण गाडीच्या प्रेमापोटी आपल्या मुलीला मारले हे त्यांना सहनच झाले नाही. त्याच भरात ते गाडीजवळ गेले आणि तिच्यामुळे हे घडले म्हणून त्या नव्या कोर्‍या गाडीवर लाथा झाडायला लागले. थोड्यावेळाने त्यांचे लक्ष गाडीवर लिहिलेल्या अक्षरांवर गेले. त्यांच्या मुलीने तिथेच काही तरी खरडलं होतं. त्यांनी जवळ जाऊन नीट पाहिलं. त्यावर त्या मुलीनं लिहिलं होतं, ‘बाबा, लव्ह यू’. त्या मुलीच्या वडिलांनी दुसर्‍या दिवशी आत्महत्या केली.
बोध :
त्यामुले संताप हा माणसाला कुठेही घेउन जातो . कुठलीही गोष्ट पूर्णपणे विचार करुनच करावी त्यातच खरी कसोटी असते .

Friday, October 23, 2009

कॉफीची चव................ खारट की गोड???

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्राणप्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो.
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"

Saturday, October 10, 2009

काही प्रश्न न सुतन्या सारखे जे मला नेहमी उद्भवतात

काही प्रश्न न सुतन्या सारखे : जे मला नेहमी उद्भवतात : कदाचित तुम्ह्लाही कधी कलि पडले असतील

१}जंगल मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती?2
2}फ्री गिफ्ट" म्हणजे काय? गिफ्ट फ्रीच असतात ना
३}प्रकाशाचा वेग माहिती आहे.... अंधाराचा किती असतो?
४}"फ्रेंच किस"ला फ्रान्स मध्ये काय म्हणतात? 5
5}जर आपला जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर ईतर लोक कशासाठी जन्मलेत?6
6}२१ - ट्वेंटी वन , ३१ - थर्टी - वन मग, ११ - वन्टी वन का नाही?.............
7}पेरुची बी आणि दातांतील फट, एकाच मापाची का असते?..............
8}छतावरचा पंखा घडाळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध तर टेबलावरचा पंखा काट्यांच्या दिशेने का फिरतो?
९}गाडीच्या पाठीमागे "आईचा आशिर्वाद" लिहिणा-यांचे वडील रागीट असतात काय ?

Sunday, July 26, 2009

आपल्या मराठी पण असे कही शब्द आहेत

आपल्या मराठी मध्ये पण असे कही शब्द आहेत ........
जेव्हा अपन एखादी भाषा आणि तिचा वापर करतो तेव्हा नेहमी थोड़ा फार मानत विचार येतोच ........जर माला ही भाषा आत्मसात करता अली तर किती मज्जा येइल म्हणजे मी जे बोलें ते बकिच्याना कलानर नाही पण आपल्या मराठी भाषेत असेही काही शब्द आहेत की जे आपल्याला जसेच्या तसेच वापरावे लागतात
प्रत्येक मराठी मानुस म्हणतो माला मराठी खुप चांगला येता पण कुठे तरी एक शब्द असा तोंडात येतोच की जो इंग्रजी असतो तेव्हा हे म्हानाने अगदी गैर वाटेल की आम्ही मराठी आहोत एरव्ही नेहमी मराठीच अभिमान असणारी माणसा सुध्हा कधी कधी बोलूं जातात इंग्रजी तुन मराठीचा अस्त होतोय का इत्यादी चर्चांमध्ये तर मला बिलकूल रस नाही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासाबरोबरच विकसित झालेली अशी आपली मराठी भाषा आहे। आजच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात, विशेषतः तांत्रिक वापरासाठी मराठीचा दुराग्रहाने केलेला वापर हा क्लिष्टताच वाढवतो, आणि त्याचं वाचन उगीचच अवघड करून टाकतो असे माझे प्रामाणिक मत आहे. प्रत्येक इंग्रजी/हिंदी शब्दास मराठी प्रतिशब्द हा हवाच का हा चर्चेचा विषय ठरेल. इंग्रजीत "जानवे" यास प्रतिशब्द नाही. तसेच मराठीत opera ला चपखल शोभेल असा शब्द नाही. आणि blog ला तर नाहीच नाही. हे सत्य आहे!असे सगळे असताना, दिवसेंदिवस इंग्रजीचा/हिंदीचा बोली भाषेत वापर वाढत असताना काही शब्द, किंवा वाक्प्रचार हळूहळू वापरातून कमी होताना दिसतात. भाषेच्या जीवनातली तिही एक phase असावी. गंमत म्हणून का होईना असे काही आडवळणी शब्द आठवले की ते मनापासून वापरावेसे वाटतात. त्यापैकी असे काही शब्द:
उडाणटप्पू
धटिंगण
ऐसपैस
वायफळ
पटांगण
झणझणीत
असले कही अजूनही शब्द असतील जर तुम्हला पण कही असे शब्द माहित असतील तर टिपण्णी पोस्ट करा
हा मज़ा एक प्रयत्न आहे तो कितपत यशस्वी ठरला आहे ते तुम्ही कलावावे

Followers